भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११८ :
या प्रकरणाप्रमाणे जप्त अगर सरकारजमा मिळकतीची देखभाल-व्यवस्था :
१) ज्या भागात मिळकत आहे त्या ठिकाणचे डि.मॅ.अगर डि.मॅ. ज्याची नेमणूक करतील अशा व्यक्तीला न्यायालय मिळकतीचा देखभाल करणारा म्हणून नेमतील.
२) कलम ११७ पोटकलम (१) अगर कलम १२० खाली केलेल्या आदेशानुसार जी मिळकत वरील पोटकलम (१) खाली नेमलेल्या देखभाल अधिकाऱ्याकडे देईल. त्यानंतर त्यांनी त्याची देखभाल केंद्र सरकार नमूद करतील, त्या अटींनुसार करावी.
३) केंद्र सरकार ठरवील त्याप्रमाणे पोटकलम (१)खाली नेमलेला देखभाल अधिकारी जी मिळकत केंद्र सरकारकडे जमा केली आहे त्याचे विल्हेवाटीबाबत उपाययोजना आखतील.