भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११७ :
जप्त मिळकतीचा ताबा :
१) कलम ११६ खाली तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास विश्वास ठेवण्यास वाजवी कारण आहे की ज्या मिळकतीबाबत अशी चौकशी वगैरे चालू आहे ती मिळकत लपविली जाण्याची, हस्तांतरित होण्याची अगर विल्हेवाट होण्याची दाट शक्यता आहे तर ते अधिकारी मिळकत ताब्यात घेण्याचा आदेश देतील आणि तसे शक्य नसेलतर ती मिळकत जप्त करतील आणि सूचना देतील की सदरची मिळकत हस्तांतरित करू नये अगर इतर प्रकारे त्याची विल्हेवाट करू नये आणि अधिकाऱ्याचे पूर्वपरवानगीशिवाय असे करू नये आणि या हुकुमाची एक प्रत त्या संबंधी माणसावर बजाविली जाईल.
२) पोटकलम (१) मधील केलेला आदेश मान्य होण्याकरता त्या कोर्टाची मंजुरी तीस दिवसांचे आत घेतली पाहिजे.