भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११५ :
मालाची जप्ती- ताबा या संबंधातील मदत :
१) भारतामधील कोर्टाला विश्वास ठेवण्यास वाजवी कारणे आहेत की अपराध करून कोणत्याही व्यक्तीने कोणतीही मिळकत प्रत्यक्षपणे-अप्रत्यक्षपणे जमविली आहे तर ते कोर्ट मिळकत जप्त करून सरकारजमा करण्याचा आदेश योग्य वाटेल त्याप्रमाणे पुढे दिलेल्या कलम ११६ ते कलम १२२ तरतुदींप्रमाणे देतील.
२) वरील पोटकलम (१)प्रमाणे कोर्टाने मिळकत जप्तीची अगर सरकारजमा करण्याचा आदेश दिला तर आणि अशी मिळकत जर करार केलेल्या देशामध्ये असेल तर न्यायालय त्या देशातील विनंतीपत्र देऊन अगर आदेश देऊन अंमलबजावणी करवील.
३) जेव्हा करार केलेल्या देशामधून केंद्र सरकारला विनंतीपत्र मिळाले आहे की मिळकत जप्त करावी अगर सरकारजमा करावी आणि जी मिळकत प्रत्यक्षपणे अगर अप्रत्यक्षपणे अपराध करून त्या करार केलेल्या देशात मिळवलेली आहे, तर केंद्र सरकार असे विनंतीपत्र योग्य त्या कोर्टास पाठवील आणि कलमे ११६ ते १२२ (दोन्ही) प्रमाणे अगर प्रचलित कायद्यानुसार अंमलबजावणी करवील.