Bnss कलम ११३ : भारताबाहेरील देश किंवा ठिकाण यांच्याकडून भारतातील न्यायालय किंवा प्राधिकरण याच्याकडे अन्वेषणासाठी विनंतीपत्र :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११३ :
भारताबाहेरील देश किंवा ठिकाण यांच्याकडून भारतातील न्यायालय किंवा प्राधिकरण याच्याकडे अन्वेषणासाठी विनंतीपत्र :
१) भारतातील न्यायालयाकडे किंवा ठिकाणी भारताबाहेरील, विनंतीपत्र पाठविण्यास सक्षम असलेल्या न्यायालयाकडून किंवा ठिकाणाहून त्या न्यायालयात किंवा ठिकाणी अन्वेषणाधीन अपराधांच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीला तपासणीसाठी किंवा कोणतीही कागदपत्रे किंवा वस्तू सादर करण्यासाठी विनंती करणारे विनंतीपत्र मिळाल्यावर केंद्रशासन तसे करणे आवश्यक वाटले तर;-
एक) ते पत्र मुख्य महानगर दंडादिकाऱ्याकडे किंवा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे किंवा ते याबाबतीत नियुक्त करील अशा, महानगर दंडाधिकाऱ्याकडे किंवा न्याय दंडाधिकाऱ्याकडे पाठवील, तो त्यानंतर जणू काही तो अपराध भारतात करण्यात आल्याप्रमाणे त्या व्यक्तीला समन्स काढून आपल्यासमोर बोलावील आणि त्याचे निवेदन नोंदवून घेईल किंवा दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडील; किंवा
दोन) ते पत्र कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे अन्वेषणासाठी पाठवील आणि त्यानंतर, जणू काही तो अपराध भारतात आल्याप्रमाणे, तो (पोलीस अधिकारी) त्या अपराधाचे अन्वेषण करील.
२) पोटकलम (१) अन्वये घेतलेला किंवा गोळा केलेला सर्व पुरावा किंवा त्याच्या अभिसाक्षांकित प्रती किंवा अशा प्रकारे गोळा केलेल्या वस्तू दंडाधिकारी किंवा त्याच्या यथास्थिती, पोलीस अधिकारी, केंद्र शासनाकडे, विनंतीपत्र पाठविणाऱ्या न्यायालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे पाठविण्यासाठी, केंद्र शासनाला योग्य वाटेल अशा रीतीने पारेषित करील.

Leave a Reply