Bnss कलम ११२ : भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी तपासासाठी सक्षम अधिकाऱ्याला विनंतीचे पत्र :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११२ :
भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी तपासासाठी सक्षम अधिकाऱ्याला विनंतीचे पत्र :
१) जर अन्वेषण करीत असताना अन्वेषण अधिकाऱ्याने किंवा अन्वेषण अधिकाऱ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने भारताबाहेरील एखाद्या देशात किंवा ठिकाणी पुरवा उपलब्ध होऊ शकेल असा अर्ज केला असेल तर, कोणत्याही फौजदारी न्यायालयात प्रकरणाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती याची माहिती असण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही व्यक्तीची तोंडी तपासणी करणे आणि अशा तपासणीच्या दरम्यानची त्या व्यक्तीची निवेदने अभिलिखित करणे यासाठी कार्यवाही करण्यास सक्षम असेल अशा त्या देशातील न्यायालयाकडे किंवा एखाद्या प्राधिकरणास, विनंतीपत्र पाठवू शकेल, आणि तसेच त्या प्रकरणाच्या संबंधातील अशा व्यक्तीच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात असतील असे कोणतेही दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यास त्या व्यक्तीला फर्मावण्याची आणि अशा प्रकारे घेतलेले किंवा गोळा केलेले सर्व पुरावे किंवा त्यांच्या अधिप्रमाणित प्रती किंवा अशा प्रकारे गोळा केलेल्या वस्तू असे पत्र पाठविणाऱ्या न्यायालयाकडे पाठविण्याचीही विनंती करू शकेल.
२) हे विनंतीपत्र केंद्रशासन याबाबतीत विनिर्दिष्ट करील अशा रीतीने पारेषित करण्यात येईल.
३) पोटकलम (१) अन्वये अभिलिखित केलेले प्रत्येक निवेदन किंवा मिळालेले दस्तऐवज किंवा वस्तू या – या संहिता अन्वये अन्वेषण करताना गोळा केलेला पुरावा असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply