भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(D) ग) (ड) – संकिर्ण :
कलम १०५ :
दृक-श्राव्य (ऑडियो व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे झडती आणि जप्तीची नोंदणी करणे :
या प्रकरणाच्या किंवां कलम १८५ अधीन कोणत्याही मालमत्तेची, वस्तूची किंवा वस्तुच्या जागेची झडती करण्याची किंवा जप्त करण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये अशा झडती आणि जप्ती दरम्यान जप्त केलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार करणे आणि साक्षीद्वारांद्वारे अशा यादीवर स्वाक्षरी करणे समाविष्ट आहे, कोणत्याही दृक-श्राव्य (ऑडियो-व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेल फोनला प्राधान्य देताना रेकॉर्ड (नोंदणी करणे) केला जाईल आणि पोलिस अधिकाऱ्याने विलंब न लावता असे रेकॉर्डिंग (नोंदणी) यथास्थिति, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांना पाठवावे.