भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०१ :
अपहरण केलेल्या स्त्रियांना पूर्ववत मोकळे करण्याठी सक्ती करण्याची शक्ती :
कोणत्याही बेकायदेशीर प्रयोजनासाठी एखाद्या स्त्रीचे किंवा बालिकेचे अपहरण केल्याबद्दल किंवा तिला अवैधपणे अडकवून ठेवल्याबद्दल शपथेवर फिर्याद देण्यात आल्यावरून, जिल्हा दंडाधिकारी, उप-विभागीय दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी अशा स्त्रीला तत्काळ पूर्ववत मोकळे करण्याचा किंवा अशा बालिकेला तिच्या आई-वा- बापाच्या, पालकाच्या किंवा ज्या व्यक्तीवर अशा बालिकेचा कायदेशीर रक्षणभार असेल अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या स्वाधीन करण्याचा आदेश काढू शकेल व जरूर असेल तेवढया बळाचा वापर करून अशा आदेशाचे अनुपालन करवून घेऊ शकेल.