भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०० :
गैरपणे परिरुद्ध केलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी झडती :
ज्या परिस्थितीत परिरोध करणे हे अपराध या सदरात मोडेल अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला परिरूध्द करण्यात आले आहे असे कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याला, उप-विभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला सकारण वाटत असेल तर, तो झडती- वॉरंट काढू शकेल आणि असे वॉरंट ज्या व्यक्तीला निदेशून काढलेले असेल ती व्यक्ती याप्रमाणे परिरूध्द करण्यात आलेल्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी झडती घेऊ शकेल; आणि अशी झडती त्या वॉरंटनुसार घेतली जाईल व जर ती व्यक्ती सापडली तर तिला तत्काळ दंडाधिकाऱ्यासमोर नेले जाईल व तो त्या प्रकरणाच्या परिस्थितीत योग्य दिसेल असा आदेश संमत करील.