Bnss कलम ७४ : वॉरंटे कोणास देता येतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७४ :
वॉरंटे कोणास देता येतात :
१) अटकेचे वॉरंट सर्वसामान्यपणे एका किंवा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना निदेशून लिहिले जाईल; पण अशा वॉरंटाची तत्काळ अंमलबजावणी होणे जरुरीचे असेल व कोणताही पोलीस अधिकारी तत्काळ उपलब्ध नसेल तर, ते अन्य कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना निदेशून लिहिता येईल, आणि अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती त्याची अमंलबजावणी करतील.
२) जेव्हा वॉरंट एकाहून अधिक अधिकाऱ्यांना किंवा व्यक्तींना निदेशून लिहिलेले असेल तेव्हा, ते सर्व किंवा त्यांच्यापैकी कोणीही एक किंवा अधिक जण त्याची अंमलबजावणी करू शकतील.

Leave a Reply