भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०७ :
ज्यामुळे कार्यवाही रद्दबातल होते अशा गैरनियम (अनियमित) बाबी :
जर कोणत्याही दंडाधिकाऱ्याने त्या संबंधात विधित: अधिकार प्रदान झालेला नसताना पुढीलपैकी कोणतीही गोष्ट केली, म्हणजे –
(a) क) (अ) कलम ८५ खाली मालमत्ता जप्त करून तिची विक्री केली;
(b) ख) (ब) डाक किंवा तार प्राधिकरणाच्या अभिरक्षेतील दस्तऐवजासाठी, पार्सलासाठी किंवा अन्य वस्तूसाठी झडती-वॉरंट काढले;
(c) ग) (क) शांतता राखण्यासाठी जामीन मागितला;
(d) घ) (ड) सद्वर्तनासाठी जामीन मागितला;
(e) ङ) (इ) सद्वर्तनी असण्यास विधित: बांधील असलेल्या व्यक्तीला विनादोषारोप सोडले;
(f) च) (फ) शांतता राखण्याबाबतचे बंधपत्र रद्द केले.
(g) छ) (ग) निर्वाहखर्चाचा आदेश दिला.
(h) ज) (ह) स्थानिक उपद्रवाबाबत कलम १५२ खाली आदेश दिला.
(i) झ) (आय) सार्वजनिक उपद्रवाची पुनरावृत्ती होण्यास किंवा तो चालू राहण्यास कलम १६२ खाली मनाई केली;
(j) ञ) (जे) ११ व्या प्रकरणाच्या भाग(C)ग किंवा भाग (D)घ खाली आदेश दिला.
(k) ट) (के) कलम २१० च्या पोटकलम (१) मधील खंड (c)(ग) खाली अपराधाची दखल घेतली;
(l) ठ) (एल) अपराध्याची संपरीक्षा केली;
(m) ड)(एम) अपराध्याची संक्षेपत: संपरीक्षा केली;
(n) ढ) (एन) दुसऱ्या दंडाधिकाऱ्याने कार्यवाही वृत्त नमूद केले असता, कलम ३६४ खाली शिक्षादेश दिला;
(o) ण) (ओ) अपिलाचा निर्णय केला;
(p) त) (पी ) कलम ४३८ खाली कार्यवाहीपत्रे मागवून घेतली;
(q) थ) (क्यू) कलम ४९१ खाली दिलेल्या आदेशाचे पुनरीक्षण केले तर, त्याची कार्यवाही शून्य होईल.