Bnss कलम ४६२ : अशा वॉरंटाचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६२ :
अशा वॉरंटाचा परिणाम :
कोणत्याही न्यायालयाने कलम ४६१ च्या पोटकलम (१) च्या खंड (a)(क) खाली काढलेल्या वॉरंटाची अंमलबजावणी अशा न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेत करता येईल व अशा अधिकारितेबाहेरील अशी कोणतीही मालमत्ता ज्याच्या स्थानिक अधिकारितेत सापडेल त्या जिल्हा दंडाधिकाऱ्याने ते वॉरंट पृष्ठांकित केले की, त्याद्वारे अशा मालमत्तेची जप्ती व विक्रि करणे प्राधिकृत होईल.

Leave a Reply