भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८९ :
समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे :
१) जर फौजदारी न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी समन्स काढण्यात आलेला कोणताही साक्षीदार समन्सचे पालन म्हणून विवक्षित स्थळी व वेळी उपस्थित राहण्यास कायद्याने बांधलेला होता आणि त्या स्थळी किंवा वेळी हजर राहण्यात रास्त सबबीशिवाय त्याने कसूर केली किंवा त्यास नकार दिला किंवा ज्या स्थळी त्याने उपस्थित राहावयाचे तेथून ज्या वेळी त्याने निघून जाणे योग्य होते त्यापूर्वी तो तेथून निघून गेला आणि ज्या न्यायालयासमोर त्याने उपस्थित राहावयाचे त्याचे अशा साक्षीदाराची संक्षिप्त संपरीक्षा करावी हे न्यायहितार्थ समयोचित आहे याबाबत समाधान झाले तर ते न्यायालय त्या अपराधाची दखल घेऊ शकेल आणि अपराध्याला या कलमाखाली शिक्षा का करण्यात येऊ नये याचे कारण दाखवण्याची त्याला संधी दिल्यानंतर जास्तीत जास्त पाचशे रूपये इतका द्रव्यदंड त्याला ठोठावू शकेल.
२) अशा प्रत्येक खटल्यात, न्यायालय संक्षिप्त संपरीक्षांसाठी विहित केलेल्या प्रक्रियेस शक्य तितकी जवळची प्रक्रिया अनुसरील.