भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७० :
चौकशी किंवा संपरीक्षा पुन्हा सुरू करणे :
१) जेव्हा केव्हा कलम ३६७ किंवा कलम ३६८ खाली चौकशी किंवा संपरीक्षा लांबणीवर टाकण्यात येईल तेव्हा, दंडाधिकाऱ्यास किंवा, प्रकरणपरत्वे, न्यायालयास, संबंधित व्यक्ती मनोविकल असण्याचे बंद झाल्यानंतर कोणत्याही वेळी चौकशी किंवा संपरीक्षा पुन्हा सुरू करता येईल, आणि अशा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर आरोपीने उपस्थित व्हावे किंवा त्यास आणावे असे फमाविता येईल.
२) जेव्हा कलम ३६९ खाली आरोपीस सोडून देण्यात आले असेल आणि त्याच्या उपस्थितीबद्दलचे जामीनदार त्याला दंडाधिकारी किंवा न्यायालय यासंबंधात नियुक्त करील अशा अधिकाऱ्याकडे हजर करतील तेव्हा, आरोपी स्वत:चा बचाव करण्यास क्षम आहे अशा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पुराव्यात स्वीकारण्याजोगे असेल.