Bnss कलम २९१ : आपआपसात समाधान कारक निपटाऱ्यासाठी मार्गदर्शक तत्वे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९१ :
आपआपसात समाधान कारक निपटाऱ्यासाठी मार्गदर्शक तत्वे :
कलम २९०, पोटकलम (४) च्या खंड (a)(क) (अ) अन्वये परस्पर मान्यतेने प्रकरण निकालात काढण्यासाठी तपशील ठरविताना न्यायालय पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करील :
(a) क) (अ) पोलीस अहवालावरून सुरू केलेल्या प्रकरणामध्ये, न्यायालय, सरकारी अभियोक्ता,त्या प्रकरणाचे अन्वेषण ज्याने केले आहे असा पोलीस अधिकारी, आरोपी आणि प्रकरणात हानी पोहोचलेली व्यक्ती यांना, ते प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासाठी तपशील ठरविण्याच्या बैठकीत उपस्थित राहण्याची नोटीस पाठवील :
परंतु असे की, प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्याच्या अशा संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षकारांच्या स्वेच्छेने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे याबाबत खात्री करून घेणे हे त्या न्यायालयाने कर्तव्य असेल :
परंतु आणखी असे की, आरोपीची तशी इच्छा असेल तर त्याला, त्याने त्या प्रकरणासाठी नेमलेल्या वकिलासह अशा बैठकीत सहभागी होता येईल;
(b) ख) (ब) पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्य प्रकारे सुरू केलेल्या प्रकरणामध्ये न्यायालय, आरोपी आणि त्या प्रकरणात हानी पोहोचलीली व्यक्ती यांना,ते प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासाठी तपशील ठरविण्याच्या बैठकीत उपस्थित राहाण्याची नोटीस पाठवील:
परंतु असे की, प्रकरण समाधानकारपणे निकालात काढण्याच्या अशा संपूर्ण प्रक्रियेमध्ये, त्या बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षकारांच्या स्वेच्छेने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे याबाबत खात्री करून घेणे हे त्या न्यायालयाचे कर्तव्य असेल :
परंतु आणखी असे की, त्या प्रकरणात हानी पोहोचलेल्या व्यक्तीची किंवा आरोपीची तशी इच्छा असेल तर, त्याला त्याने त्या प्रकरणासाठी नेमलेल्या वकिलासह अशा बैठकीत सहभागी होईल.

Leave a Reply