Bnss कलम २८९ : प्रकरण लागू असणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २३ :
सौदा करण्यासाठी विनंती :
कलम २८९ :
प्रकरण लागू असणे :
१) ज्या आरोपी विरूध्द-
(a) क) (अ) पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने कलम १९३ अन्वये अहवाल पाठवला असेल आणि त्यात ज्या अपराधासाठी मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची किंवा सात वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद त्या – त्या वेळी अमलात असलेल्या कायद्याव्दारे करण्यात आली असेल त्याव्यतिरिक्त अन्य अपराध त्याने केला असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत असल्याचे अभिकथन केलेले असेल;किंवा
(b) ख) (ब) एखाद्या दंडाधिकाऱ्याने, ज्या अपराधासाठी मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या किंवा सात वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद त्या- त्या वेळी अमलात असलेल्या कायद्याव्दारे करण्यात आली असेल त्याव्यतिरिक्त अन्य अपराध केल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेतली असेल, आणि फिर्याददाराची व साक्षीदारांची कलम २२३ अन्वये साक्षतपासणी करून कलम २२७ अन्वये आदेशिका काढली असेल,
अशा आरोपीस हे प्रकरण लागू होते, मात्र अशा अपराधामुळे देशाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर परिणाम केला असेल किंवा असा अपराध महिलेच्या बाबतीत किंवा बालकाच्या बाबतीत करण्यात आला असेल अशा बाबतीत तो लागू असणार नाही.
२) पोटकलम (१)च्या प्रयोजनांसाठी, त्या- त्या वेळी अमलात असलेल्या कायद्यान्वये देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर परिणाम करणारे अपराध कोणते हे, केंद्र शासन अधिसूचनेद्वारे निर्धारित करील.

Leave a Reply