भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७९ :
फिर्यादीची अनुपस्थिती अगर मृत्यू :
१) जर दिलेल्या फिर्यादीवरून समन्स काढण्यात आले असेल आणि आरोपीच्या अनुपस्थितीसाठी नियत केलेल्या दिवशी किंवा त्यानंतरच्या ज्या कोणत्याही दिवसापर्यंत सुनावणी तहकूब केली जाईल त्या दिवशी फिर्याददार उपस्थित राहिला नाही तर, फिर्याददाराला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिल्या नंतर, यात यापूर्वी काहीही अंतर्भूत असले तरी, दंडाधिकारी आरोपीस दोषमुक्त करील-मात्र, त्या प्रकरणाची सुनावणी अन्य एखाद्या दिवसापर्यंत तहकूब करणे त्याला काही कारणास्तव उचित वाटले तर गोष्ट वेगळी :
पंरतु, जेव्हा एखादा वकील किंवा खटला चालवणारा अधिकारी फिर्याददाराचे प्रतिनिधित्व करत असेल अथवा जेव्हा फिर्याददाराने जातीनिशी उपस्थित राहण्याची जरूरी नाही असे दंडाधिकाऱ्याचे मत असेल तेव्हा, दंडाधिकारी त्याची उपस्थिती माफकरून खटला पुढे चालवू शकेल.
२) पोटकलम (१) चे उपबंध हे, फिर्याददाराच्या मृत्यूमूळे त्याची अनुपस्थिती घडली असेल अशा प्रकरणांना देखील, शक्य होईल तेथवर लागू होतील.