भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७७ :
सिध्ददोष न केल्यास पुढील प्रक्रिया :
१) जर दंडाधिकाऱ्याने कलम २७५ किंवा कलम २७६ खाली आरोपीस सिध्ददोष ठरवले नाही तर, दंडाधिकारी फिर्यादी पक्षाची बाजू ऐकून घेऊन फिर्यादी पक्षाच्या पुष्ट्यर्थ हजर केला जाईल असा सर्व साक्षीपुरावा घेण्याच्या आणि आरोपीचीही बाजू ऐकून आपल्या बचावासाठी तो हजर करील असा सर्व साक्षीपुरावा घेण्याच्या कामास लागेल.
२) फिर्यादीपक्षाच्या किंवा आरोपीच्या अर्जावरून, दंडाधिकारी स्वत:ला योग्य वाटल्यास कोणत्याही साक्षीदारावर त्याला समक्ष हजर होम्याचा अथवा कोणताही कागद किंवा अन्य वस्तू हजर करण्याचा निदेश देणारे समन्स काढू शकेल.
३) अशा अर्जावरून कोणत्याही साक्षीदाराला समन्स काढण्यापूर्वी दंडाधिकारी संपरीक्षेसाठी हजर होण्याकरता साक्षीदाराला येणाऱ्या वाजवी खर्चाची रक्कम न्यायालयात जमा केली जावी असे फर्मावू शकेल.