Bnss कलम २६६ : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६६ :
बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :
१) त्यानंतर आरोपीला आपला बचाव सुरू करण्यास व आपला साक्षीपुरावा हजर करण्यास सांगितले जाईल, आणि जर आरोपीने कोणतेही कैफियतपत्र दिले तर, दंडाधिकारी ते अभिलेखात दाखल करील.
२) आपल्या बचावाला सुरूवात केल्यानंतर जर साक्षतपासणीसाठी किंवा उलटतपासणीसाठी एखाद्या साक्षीदारास समक्ष हजर होण्यास अथवा कोणताही दस्तऐवज किंवा अन्या वस्तू हजर केली जाण्यास भाग पाडण्याकरता कोणतीही अदिशिका काढण्याबाबत आरोपीने दंडाधिकाऱ्याकडे अर्ज केला तर, दंडाधिकारी अशी आदेशिका काढील-मात्र, असा अर्ज त्रास देण्यासाठी किंवा विलंब लावण्यासाठी किंवा न्यायाची उद्दिष्टे विफल करण्यासाठी केलेला आहे या कारणास्तव नाकारला जावा असे त्याला वाटले तर, त्याला असे कारण लेखी नमूद करावे लागेल :
परंतु, आपल्या बचावाला सुरूवात करण्यापूर्वी आरोपीने कोणत्याही साक्षीदाराची साक्षतपासणी केली असेल किंवा त्याची उलटतपासणी घेण्याची संधी त्याला होती असे असेल तर, अशा साक्षीदाराची समक्ष हजेरी न्यायाच्या उद्दिष्टांसाठी जरूरीची आहे, अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाल्याशिवाय कलमाखाली त्याला हजर राहण्यास भाग पाडले जाणार नाही :
परंतु आणखी असे की, या कलमाखाली साक्षीदाराची परीक्षा, राज्य सरकार द्वारा अधिसूचित केलेल्या नियुक्त ठिकाणी श्रव्य-दृश्य (ऑडियो – व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केली जाऊ शकेल.
३) पोटमलम (२) खालील अर्जावरून कोणत्याही साक्षीदाराला समन्स काढण्यापूर्वी दंडाधिकारी संपरीक्षेच्या प्रयोजनार्थ हजर राहण्यासाठी साक्षीदाराला येणाऱ्या वाजवी खर्चाची रक्कम न्यायालयात जमा केली जावी अशी आज्ञा करू शकेल.

Leave a Reply