Bnss कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(B) ख) (ब) – दोषारोप एकत्र करणे :
कलम २४१ :
वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :
१) कोणत्याही व्यक्तीवर ज्याचा आरोप करण्यात आला असेल अशा प्रत्येक विभिन्न अपराधाबद्दल अलगअलग दोषारोप असेल, आणि अशा प्रत्येक दोषारोपाची संपरीक्षा अलगअलगपणे केली जाईल:
परंतु, जेव्हा आरोपी व्यक्ती लेखी अर्जाद्वारे तशी इच्छा व्यक्त करील आणि अशा व्यक्तीला ते बाधक होणार नाही असे दंडाधिकाऱ्याचे मत असेल तेव्हा त्या बाबतीत, दंडाधिकाऱ्याला अशा व्यक्तीविरूध्द मांडणी केलेल्या सर्व किंवा कितीही दोषारोपांची एकत्रितपणे संपरिक्षा करता येईल.
२) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट २४२, २४३, २४४, व २४६ या कलमांतील उपबंधाच्या प्रवर्तनावर परिणाम करणार नाही.
उदाहरण :
(क) वर एका प्रसंगी चोरी केल्याचा आणि अन्य प्रसंगी जबर दुखापत केल्याचा आरोप आहे. चोरीबद्दल व जबर दुखापत केल्याबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याची अलगअलगपणे संपरीक्षा केली पाहिजे.

Leave a Reply