भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १२ :
पोलिसांची प्रतिबंधक कारवाई :
कलम १६८ :
पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे :
प्रत्येक पोलीस अधिकारी कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनासाठी हस्तक्षेप करू शकेल आणि तो आपल्या सामथ्र्यांच्या पराकाष्ठेपर्यंत त्याला प्रतिबंध करील.