Bnss कलम १५५ : कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५५ :
कलम १५४ पालन करण्यात अयशस्वी झाल्यास शास्ति :
जर अशा व्यक्तीने ज्याच्या विरुद्ध कलम १५४ च्या अन्वये कोणताही आदेश दिला गेला आहे, अशी कृती केली नाही किंवा उपस्थित होऊन कारण दाखवले नाही, तर, ती भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम २२३ खाली त्यासंबंधात विहित केलेल्या शिक्षेला पात्र होईल आणि आदेश कायम केला जाईल.

Leave a Reply