भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४३ :
बंधपत्राच्या न सरलेल्या (शेष अवधि) कालावधीकरता जामीन :
१) कलम १४० च्या पोटकलम (३) च्या परंतुकाखाली किंवा कलम १४२ च्या पोटकलम (१०) खाली जिच्या उपस्थितीकरता समन्स किंवा वॉरंट काढण्यात आले असेल ती व्यक्ती जेव्हा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा आणली जाईल तेव्हा, दंडाधिकारी किंवा न्यायालय अशा व्यक्तीने निष्पादित केलेले बंधपत्र किंवा जामीनपत्र रद्द करील आणि अशा बंधपत्राच्या मुदतीच्या न सरलेल्या भागाकरता मूळ जामिनाच्या वर्णनाचाच नवीन जामीन देण्याचा अशा व्यक्तीला आदेश देईल.
२) असा प्रत्येक आदेश कलमे १३९ ते १४२ ( दोन्ही धरून) यांच्या प्रयोजनार्थ कलम १२५ किंवा, प्रकरणपरत्वे, कलम १३६ खाली काढलेला आदेश असल्याचे मानले जाईल.