भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९७ :
दहा वर्षांखालील बालकाच्या अंगावरील मालमत्ता चोरण्याच्या उद्देशाने त्याचे अपनयन किंवा अपहरण करणे :
कलम : ९७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दहा वर्षाखालील बालकाच्या अंगावरील मालमत्ता काढून घेण्याच्या उद्देशाने त्या बालकाचे अपनयन किंवा अपहरण करणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
दहा वर्षांखालील कोणत्याही बालकाच्या अंगावरील कोणतीही जंगम मालमत्ता अप्रामाणिकपणाने हिरावून घेण्याच्या उद्देशाने जो कोणी अशा बालकाचे अपनयन किंवा अपहरण करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.