Bns 2023 कलम ९६ : बालक अनैतिक कृत्यासाठी मिळविणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९६ :
बालक अनैतिक कृत्यासाठी मिळविणे :
कलम : ९६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालक अनैतिक कृत्यासाठी मिळविणे
शिक्षा : १० वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
बालकावर दुसऱ्या व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याची बळजबरी करता यावी किंवा त्यासाठी तिला फूस लावता यावी या उद्देशाने अथवा त्याच्यावर तशी बळजबरी होईल किंवा त्याला त्यासाठी फूस लावण्यात येईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना, कोणत्याही उपायांनी जो कोणी अशा बालकाला एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास किंवा कोणतीही कृती करण्यास प्रवृत्त करील त्याला दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply