भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९४ :
मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे:
कलम : ९४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत देहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्यजन्माची लपवणूक पोचवणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
एखाद्या मुलाचा मृतदेह-मग ते मूल त्याचे जन्माच्या पूर्वी मेलेले असो किंवां जन्मानंतर असो किंवा जन्म होत असताना ते मेलेले असो- ते गुप्तपणे पुरून किंवा त्याची अन्य प्रकारे विल्हेवाट लावुन, जो कोणी अशा मुलाचा जन्म झालयाचे उद्देशपूर्वक लपवून ठेवील किंवा लपविण्याचा प्रयत्न करील तर त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.