Bns 2023 कलम ९३ : बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघडयावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
बालकाच्या विरुद्ध अपराधांविषयी :
कलम ९३ :
बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघडयावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे:
कलम : ९३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : १२ वर्षे वयाखालील मुलाला त्याच्या आई-बापाने किंवा जिच्याकडे त्याची देखभाल आहे त्या व्यक्तीने त्या मुलाचा संपुर्णत: परित्याग करण्याच्या उद्देशाने त्याला उघड्यावर टाकणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी स्वत: बारा वर्षाखालील मुलाचा बाप किंवा आई असून किंवा स्वत:कडे अशा मुलाची देखभाल असून, अशा मुलाचा संपूर्णत: परित्याग करण्याचे उद्देशाने त्या मुलास कोणत्याही जागी उघडयावर टाकील किंवा त्याला सोडून देईल तर त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
याप्रमाणे उघड्यावर टाकल्याचा परिणाम म्हणून ते मूल मृत्यू पावले तर खुनाबद्दल किंवा प्रकरणपरत्वे, सदोष मनुष्यवधाबद्दल अपराध्याची संपरीक्षा होण्याला प्रतिबंध करण्यासाठी हे कलम योजलेले नाही.

Leave a Reply