Bns 2023 कलम ९२ : सदोष मनुष्यवध या सदरात मोडणाऱ्या कृतीद्वारे, स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यू घडवून आणणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९२ :
सदोष मनुष्यवध या सदरात मोडणाऱ्या कृतीद्वारे, स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यू घडवून आणणे:
कलम : ९२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सदोष मनुष्यवध या सदरात मोडणाऱ्या कृतिद्वारे, स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यु घडवून आणणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जर कोणी अशा परिस्थीतीत एखादी कृती करील की, त्यामुळे जर तो मृत्यूस कारण झाला तर तो सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी होऊ शकेल आणि अशा कृतीमुळे, त्या स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भ जीवाचा मृत्यू घडून आला तर त्याला, दहा वर्षेपर्यंत असु शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरण :
आपण गर्भवती स्त्रीच्या मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे याची जाणीव असताना (क) अशी कृती करतो की, त्यामुळे त्या स्त्रीचा मृत्यू घडून आला तर तो सदोष मनुष्यवध या सदरात मोडेल. त्या स्त्रीला इजा पोहोचते, पण तिचा मृत्यू होत नाही, पण त्यामुळे तिच्या गर्भातील स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यू घडून येतो. (क) हा या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेल्या अपराधाबद्दल दोषी आहे.

Leave a Reply