Bns 2023 कलम ९१ : मूल जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याचा किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेली कृती:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९१ :
मूल जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याचा किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेली कृती:
कलम : ९१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मूल जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेली कृती.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
एखाद्या मुलाच्या जन्मापूर्वी,जो कोणी ते मूल जिवंत जन्मण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्याचे जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती करील आणि अशा कृतीमुळे त्या मुलाला जिवंत जन्मण्याला प्रतिबंध करील किंवा त्याच्या जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणील त्याला, जर ती कृती आईचा जीव वाचविण्यासाठी सद्भावपूर्वक केलेली नसेल तर, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची,किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply