भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९० :
गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे:
कलम : ९० (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ९० (२)
अपराध : ती कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असल्यास.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा वरील प्रमाणे.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जर कोणी एखाद्या गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने (विथ चाईल्ड) कोणतीही कृती केली व तिच्यामुळे अशा स्त्रीचा मृत्यू घडून आला तर त्याला, दहावर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्हीं पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यादंडासही पात्र होईल.
२) जर पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असेल तर, त्याला एकतर आजीवन कारावासाची किंवा उक्त पोटकलमामध्ये नमूद केलेली शिक्षा होईल.
स्पष्टीकरण :
या अपराधासाठी त्या कृतीमुळे मृत्यू घडुन येणे हे संभवनीय आहे याची अपराध्याला जाणीव असली पाहिजे अशी आवश्यकता नाही.