Bns 2023 कलम ८ : द्रव्यदंडाची रक्कम, द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यावर, दायित्व :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८ :
द्रव्यदंडाची रक्कम, द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यावर, दायित्व :
१) द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नसेल तेथे, अपराधी ज्या रक्कमेस पात्र होतो, तेथे द्रव्यदंडाच्या रकमेवर मर्यादा असणार नाही, परंतु ती रक्कम बेसुमार असणार नाही.
२) अपराधाच्या अशा प्रत्येक प्रकरणी,
(a) क) (अ) कारावास व त्याचप्रमाणे द्रव्यदंड या शिक्षांस पात्र असलेल्या अपराधाबद्दल अपराध्याला ज्यामध्ये द्रव्यदंडाची, मग तो कारावासासहित असो वा त्याविना असो, शिक्षा झाली असेल;
(b) ख) (ब) आणि कारावास किंवा द्रव्यदंड किंवा फक्त द्रव्यदंड या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल अपराध्याला ज्यामध्ये द्रव्यदंडाची शिक्षा झाली असेल, अशा अपराध्यास शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने शिक्षादेशात असे निदेशित करणे विधिमान्य असेल की, द्रव्यदंडाचा भरणा करण्यास कसूर झाल्यास, अपराध्याला कारागृहात टाकण्यात यावे आणि हा कारावास, त्याला जी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे अथवा शिक्षा परिवर्तनामुळे तो ज्याला पात्र होऊ शकेल अशा इतर कोणत्याही कारावासापेक्षा अधिक असेल.
३) जर अपराध हा कारावासाचा व त्याचप्रमाणे द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल तर, न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात कसूर केल्याबद्दल अपराध्याला जितक्या मुदतीसाठी कारागृहात टाकण्याचा निदेश देईल ती मुदत अपराधासाठी निश्चित केलेल्या कमाल मुदतीच्या कारावासाच्या एक-चतुर्थांशापेक्षा अधिक असणार नाही.
४) द्रव्यदंड भरणा करण्यास कसूर केल्यास किंवा सामुदायिक सेवा च्या दडांसाठी कसूर केल्यास, न्यायालय जो कारावास देईल तो कारावास अपराध्याला अपराधाबद्दल ज्या प्रकारचा कारावास दिला जाऊ शकला असता अशा दोन्ही पैकी कोणत्याही वर्णनाचा असू शकेल.
५) अपराध द्रव्यदंडासच पात्र असेल किंवा सामुदायिक सेवेच्या दंडास पात्र असेल तर, न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात किंवा सामुदायिक सेवेच्या दंडाच्या शिक्षेत कसूर केल्याबद्दल जो कारावास देईल तो साधा असेल, आणि न्यायालय द्रव्यदंडाचा भरणा करण्यात किंवा सामुदायिक सेवेच्या दंडाच्या शिक्षेत कसूर झाल्यास अपराध्याला जितक्या मुदतीसाठी कारागृहात ठेवण्याचा निदेश देईल ती मुदत पुढील प्रमाणापेक्षा अधिक असणार नाही, म्हणजेच –
(a) क) (अ) द्रव्यदंडाची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल तेव्हा तो कारावास जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत मुदतीचा असेल आणि
(b) ख) (ब) द्रव्यदंडाची रक्कम दहा हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल तेव्हा तो कारावास जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत मुदतीचा असेल.
६)(a) क) (अ) द्रव्यदंडाचा भरणा करण्यातील कसुरीबद्दल देण्यात आलेला कारावास हा जेव्हा केव्हा द्रव्यदंड भरण्यात येईल किंवा विधिप्रक्रियेनुसार वसूल केला जाईल तेव्हा समाप्त होईल.
(b) ख) (ब) द्रव्यदंडाचा भरणा करण्यातील कसुरीबद्दल ठोठावण्यात आलेल्या कारावासाची मुदत संपण्यापूर्वी जर द्रव्यदंडाचा काही भाग भरण्यात आला अगर वसूल करण्यात आला व भरणा करण्यातील कसुरी बद्दलच्या कारावासापैकी जितक्या मुदतीचा कारावास भोगण्यात आला तितकी मुदत ही द्रव्यदंडापैकी न भरलेल्या भागाशी प्रमाणशीर असलेल्या मर्यादेपेक्षा कमी नसेल तर, कारावास समाप्त होईल.
उदाहरण :
(क) याला एक हजार रुपये द्रव्यदंड व तो न भरल्यास चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी, कारावासाचा एक महिना संपण्यापूर्वी जर सातशे पन्नास रुपये द्रव्यदंड भरण्यात किंवा वसूल करण्यात आला तर, पहिला महिना संपला की लेगच (क) ला मुक्त करण्यात येईल. जर पहिला महिना संपण्याच्या वेळी किंवा (क) कारावासात असेपर्यंतच्या काळात नंतर कोणत्याहीवेळी सातशे पन्नास रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, (क) ला तत्काळ मुक्त करण्यात येईल. कारावासाचे दोन महिने संपण्यापूर्वी द्रव्यदंडापैकी पाचशे रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, दोन महिने पूर्ण झाले की लगेच (क) ला मुक्त करण्यात येईल. जर दोन महिने संपण्याच्या वेळी किंवा (क) कारावासात असेपर्यंतच्या काळात नंतर कोणत्याही वेळी पाचशे रुपये भरण्यात किंवा वसूल करण्यात आले तर, (क) ला तत्काळ मुक्त करण्यात येईल.
७) भरणा व्हावयाचा राहिलेला द्रव्यदंड किंवा त्याचा कोणताही भाग हा, शिक्षादेश देण्यात आल्यापासून सहा वर्षाच्या आत कोणत्याही वेळी किंवा शिक्षादेशानुसार अपराधी सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारावासास पात्र असेल तर तो कालावधी समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही वेळी दंड वसूल करता येईल; आणि अशा अपराध्याच्या मृत्यूनंतरदेखील जी कोणती मालमत्ता त्याच्या शऋृणांबद्दल विधित: (कायद्याने) दायी होऊ शकेल ती त्याच्या मृत्यूमुळे या दायित्वातून मुक्त होत नाही.

Leave a Reply