Bns 2023 कलम ८४ : गुन्हेगारी उद्देशाने विवाहित स्त्रीस भुरळ पाडून नेणे, किंवा पळवून नेणे, किंवा अडकवून ठेवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८४ :
गुन्हेगारी उद्देशाने विवाहित स्त्रीस भुरळ पाडून नेणे, किंवा पळवून नेणे, किंवा अडकवून ठेवणे :
कलम : ८४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध करण्याच्या उद्देशाने विवाहित स्त्रीस भूरळ पाडून नेणे किंवा अडकवून ठेवणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : त्या स्त्रीचा पती व स्त्री.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जी स्त्री अन्य कोणत्याही पुरुषाची पत्नी असून, ते स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास कारण असेल अशा कोणत्याही स्त्रीला जर कोणी तिचा कोणत्याही व्यक्तीबरोबर विधिनिषिद्ध संभोग घडावा या उद्देशाने तिला दूर पळवून, किंवा भुरळ पाडून नेले, किंवा त्या उद्देशाने अशा कोणत्याही स्त्रीस लपवून किंवा अडकवून ठेवले, तर त्याला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply