भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७ :
शिक्षा (कारावासाच्या विवक्षित (काही) प्रकरणांमध्ये) संपूर्णत: किंवा अंशत: सश्रम किंवा साधी असू शकेल :
अपराधी दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असेल अशा प्रत्येक प्रकरणात, अशा अपराध्याला शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने शिक्षादेशात, असा कारावास संपूर्णत: सश्रम असावा अथवा असा कारावास संपूर्णत: साधा असावा अथवा अशा कारावासाचा एखादा भाग सश्रम व बाकीचा साधा असावा असे निदेशित करणे विधिमान्य असेल.