भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७६ :
स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : ७६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्त्रीला विवस्त्र करण्यासाठी हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
शिक्षा : किमान ३ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
स्त्रीला विवस्त्र करण्याच्या किंवा नग्न होण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने जो कोणी तिच्यावर हल्ला करील किंवा तिच्या फौजदारीपात्र बलप्रयोगाचा वापर करील किंवा तशी कृती करण्यास अपप्रवृत्त करील त्याला तीन वर्षांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र ठरेल.