Bns 2023 कलम ७१ : अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७१ :
अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा :
कलम : ७१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध वारंवार करणे.
शिक्षा : आजीवन कारावास म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित कालासाठी कारावास किंवा देहांताची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
ज्या कोणाला कलम ६४ किंवा कलम ६५ किंवा कलम ६६ किंवा कलम ७० खालील अपराधासाठी सिद्ध दोष ठरवले असेल त्याने उक्त कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये शिक्षा योग्य अपराध केल्याबद्दल त्याला पुन्हा सिद्ध दोष ठरवले असेल तर त्याला आजीवन कारावासाची म्हणजे त्याच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची किंवा देहान्ताची शिक्षा होईल.

Leave a Reply