भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६८ :
प्राधिकारी व्यक्तीने लैंगिक समागम करणे :
कलम : ६८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्राधिकारी व्यक्तीने केलेला लैंगिक समागम.
शिक्षा : किमान ५ वर्षांचा सश्रम कारावास किंवा कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी,-
(a) क)(अ) प्राधिकारी दर्जात किंवा विश्वासाश्रित नातेसंबंधात असताना; किंवा
(b) ख) (ब) लोकसेवक असताना, किंवा
(c) ग) (क) तुरुंग, सुधारगृह किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये संस्थापित केलेली हवालतीची कोणतीही जागा किंवा महिलांची किंवा मुलांची संस्था यांचा अधीक्षक किंवा व्यवस्थापक असताना, किंवा
(d) घ) (ड) रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर असताना किंवा रुग्णालयाच्या कर्मचारीवर्गात असताना, त्याच्या ताब्यातील किवा त्याच्या प्रभाराखालील किंवा त्या परिवास्तूत उपस्थित असलेल्या एखाद्या महिलेने त्याच्याशी लैंगिक समागम करावा यासाठी तिला प्रलोभन दाखवण्यासाठी किंवा फूस लावण्यासाठी आपल्या अशा दर्जाचा किवा विश्वासाश्रित नात्याचा गैरवापर करील,
तर बलात्काराचा अपराध ठरत नसणाऱ्या लैंगिक समागमासाठी त्याला पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षांपर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णनाची सश्रम कारावासाची शिक्षा होईल, आणि तो दंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण १ :
या कलमात लैंगिक समागम म्हणजे, कलम ६३ च्या खंड (क) ते (घ) मध्ये नमूद केलेली कोणतीही कृती.
स्पष्टीकरण २ :
या कलमाच्या प्रयोजनांसाठी कलम ६३ चे स्पष्टीकरण १ सुद्धा लागू असेल.
स्पष्टीकरण ३ :
तुरुंग, सुधारगृह किंवा हवालतीची इतर कोणतीही जागा यांच्या संबंधातील अधीक्षक या संज्ञेत, अशा तुरुंगात, सुधारगृहात, जागेत किंवा संस्थेत एखादी व्यक्ती इतर कोणतेही पद धारण करीत असेल आणि त्या पदांच्यामुळे अशा व्यक्तीला तेथील अंतर्वासींवर प्राधिकार किंवा नियंत्रण ठेवता येत असेल तर अशा व्यक्तीचाही समावेश होतो.
स्पष्टीकरण ४ :
रुग्णालय आणि महिलांची किंवा मुलांची संस्था या संज्ञांना, कलम ६४ च्या पोटकलम (२) च्या स्पष्टीकरणात खंड (ख) (b)आणि (घ) (d)मध्ये जो अर्थ दिला असेल तोच अर्थ असेल.