भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६७:
फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे :
कलम : ६७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक समागम.
शिक्षा : किमान २ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र (केवळ जामीनपात्र पीडितेच्या तक्रारीवर).
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, जी विलगीकरणाच्या हुकमनाम्यामुळे किंवा अन्य कारणाने वेगळी राहते अशा आपल्या पत्नीशी तिच्या संमतीविना लैंगिक समागम (संभोग) करील त्याला, दोन वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो, द्रव्यदंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमात लैंगिक समागम (संभोग) म्हणजे, कलम ६३ खंड (क) (a)ते (घ) (d)मध्ये नमूद केलेली कोणतीही कृती.