भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६५ :
विवक्षित प्रकरणांत बलात्कारासाठी शिक्षा :
कलम : ६५ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सोळा वर्षाखालील स्त्रीवर एखाद्या व्यक्तिने बलात्काराचा अपराध केला असेल.
शिक्षा : २० वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत म्हणजे त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडा सहित.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ६५ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बारा वर्षाखालील स्त्रीवर एखाद्या व्यक्तिने बलात्काराचा अपराध केला असेल.
शिक्षा : २० वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत म्हणजे त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंडा सहित किवा देहान्ताची शिक्षा होईल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी १६ वर्षा खालील स्त्री वर बलात्कार करील त्याला वीस वर्षांपेक्षा कमी नाही, परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे, त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र असेल :
परंतु असे की, असा दंड हा पीडितेचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी योग्य व वाजवी असेल इतका असेल.
परंतु आणखी असे की, या पोटकलमा नुसार लादलेला कोणताही दंड हा पीडितेला देण्यात येईल.
२) जो कोणी १२ वर्षा खालील स्त्री वर बलात्कार करील त्याला वीस वर्षांपेक्षा कमी नाही, परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे, त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड ही होईल किंवा देहान्ताची शिक्षा होईल :
परंतु असे की, असा द्रव्यदंड हा पीडितेचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी योग्य व वाजवी असेल इतका असेल :
परंतु आणखी असे की, या पोटकलमा नुसार लादलेला कोणताही दंड हा पीडितेला देण्यात येईल.