भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४८ :
भारतातील अपराधांचे भारताबाहेर अपप्रेरण (चिथावणी देणे) :
जी कोणतीही कृती भारतात केली गेली तर अपराध ठरेल ती कृती भारतात करण्यास जी व्यक्ती भारताबाहेर आणि त्याच्या पलीकडे असताना अपप्रेरणा (चिथावणी) देते ती व्यक्ती या संहितेच्या अर्थानुसार अपराध करते.
उदाहरण :
(क) हा एक्स देशातील विदेशी व्यक्ती, (ख) ला भारतात खून करण्यास चिथावणी देतो. (क) हा खुनाला अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी आहे.