Bns 2023 कलम ४२ : असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४२ :
असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो :
जो अपराध करण्यात आल्यामुळे किंवा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग उद्भवतो तो चोरीचा, आगळीक करण्याचा किंवा फौजदारीपात्र अतिक्रमणाचा अपराध असून कलम ४१ मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा नसेल तर, तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्यकर्त्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत व्यापक नसतो, परंतु कलम ३७ मध्ये उल्लेखिलेल्या निर्बंधांच्या अधीनतेने, तो हक्क अपकृत्यकर्त्याला मृत्युहून अन्य कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतका व्यापक असतोच.

Leave a Reply