भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३८ :
शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो :
शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग ज्यामुळे उद्भवतो तो अपराध यात यापुढे नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा असेल तर, लगतपूर्व कलम ३७ यात उल्लेखिलेल्या निर्बंधाच्या अधीनतेने, तो हक्क इच्छापूर्वक हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्याइतपत व्यापक असतो. ती वर्णने अशी :
(a) क) (अ) ज्या हल्लाचा परिणाम मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हल्ला;
(b) ख) (ब) ज्या हल्ल्याचा परिणाम जबर दुखापत होईल अशी वाजवी धास्ती निर्माण होईल असा हल्ला;
(c) ग) (क) बलात्कार करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला;
(d) घ) (ड) निसर्गक्रमाविरूध्द लैगिंक वासनापूर्ती करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला;
(e) ङ) (इ)अपनयन (चोरून नेणे ) किंवा अपहरण (पळवून नेणे) या उद्देशाने केलेला हल्ला;
(f) च) (फ) एखाद्या व्यक्तीला ज्या परिस्थितीत कैदेत टाकल्यास आपल्या सुटकेसाठी तिला सरकारी अधिकाऱ्यांंकडे धाव घेणे शक्य होणार नाही अशी वाजवी धास्ती निर्माण होईल, अशा परिस्थितीत तिला गैरपणे कैदेत टाकण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला;
(g) छ) (ग) ज्या कृतीमुळे एरवी जबरी दुखापत करण्याची धास्ती निर्माण होऊ शकेल अशी अॅसिड फेकण्याची किंवा देण्याची कृती करणे किंवा अॅसिड फेकण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करणे.