Bns 2023 कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३५४ :
एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती :
कलम : ३५४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिच्याबाबत अपराध केली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट करावयास लावणे हे त्या अपराध्याचे उदिष्ट आहे ती तिने केली नाही, तर, किंवा त्याला जी गोष्ट करण्याचे टाळावयास लावणे हे अपराध्याचे उदिष्ट आहे ती तिने केली, तर ती व्यक्ती किंवा जिच्यामध्ये ती हितसंबंधित आहे अशी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, किंवा अपराधाच्या कोणत्याही कृतीमुळे केली जाईल असा त्या व्यक्तीचा समज करुन देऊन, किंवा करुन देण्याचा प्रयत्न करुन त्या व्यक्तीला जी कोणतीही गोष्ट करण्यास ती विधित: बद्ध नाही ती करण्यास, किंवा जी कोणतीही गोष्ट करण्यास ती विधित: हक्कदार आहे ती करण्याचे टाळण्यास इच्छापूर्वक भाग पाडले, किंवा भाग पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला एक वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) च्या दाराशी अशा उद्देशाने धरणे धरुन बसतो की, अशा बसण्याने तो (य) ला दैवी प्रकोपाचा विषय बनवील असा समज व्हावा. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
(b) ख) (क) हा (य) ला धमकी देतो की, जर (य) ने एखादी विशिष्ट कृती केली नाही तर, (क) स्वत:च्या मुलांपैकी एकाद्या मुलाची अशा परिस्थितीत हत्या करील की, त्या हत्येमुळे (य) हा दैवी प्रकोपाचा विषय बनेल असा समज निर्माण होईल. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.

Leave a Reply