भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३४८ :
स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे :
कलम : ३४८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही सरकारी किंवा खाजगी स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कपटीपणाने कोणताही साचा, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन बनवणे किंवा जवळ बाळगणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी स्वामित्व चिन्ह नकली तयार करण्यासाठी एखादा साचा, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन बनवील किंवा कबजात बाळगील अथवा एखादा माल ज्या व्यक्तीच्या मालकीचा नाही तिच्या मालकीचा तो आहे असे दर्शवण्यासाठी एखादे स्वामित्व चिन्ह कबजात बाळगील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.