भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३४७ :
स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :
कलम : ३४७ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुसऱ्याने वापरले असेल तसे स्वामित्व-चिन्ह नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या उद्देशाने नकली तयार करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्या व्यापार-चिन्हाचे किंवा स्वामित्व-चिन्हाचे नकलीकरण झाले ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३४७ (२)
अपराध : लोकसेवकाने वापरलेले स्वामित्व-चिन्ह किंवा कोणत्याही मालमत्तेची निर्मिती, प्रत इत्यादी दर्शविण्यासाठी त्याने वापरलेले कोणतेही चिन्ह नकली तयार करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीने वापरले असेल तसे कोणतेही स्वामित्व चिन्ह नकली तयार करील, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) जो कोणी लोकसेवकाने वापरलेले कोणतेही स्वामित्व चिन्ह अथवा एखादी मालमत्ता एखाद्या विशिष्ट व्यक्तीने किंवा विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट स्थळी निर्मिलेली आहे, अगर ती मालमत्ता विशिष्ट प्रतीची आहे, किंवा एखाद्या कार्यालयाच्या मार्गे निर्गमित झालेली आहे, किंवा ती एखाद्या प्रकारे सूट मिळण्यास हक्कदार आहे, असे दर्शविण्यासाठी लोकसेवकाने वापरलेले कोणतेही चिन्ह नकली तयार करील, अथवा असे कोणतेही चिन्ह नकली आहे हे माहीत असून ते खरे म्हणून वापरील, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.