भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३४१ :
कलम ३३८ अन्वये शिक्षापात्र असलेले बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहोर, इ. बनविणे किंवा कब्जात बाळगणे :
कलम : ३४१ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय न्याय संहिता च्या कलम ३३८ खाली शिक्षापात्र असे बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने मोहोर, मुद्रापट्ट, इत्यादी बनवणे किंवा नकली तयार करणे अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट, इत्यादी नकली असल्याचे माहीत असताना तशाच उद्देशाने ते जवळ बाळगणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३४१ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३८ खाली नव्हेत तर अन्यथा शिक्षापात्र असे बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने मोहोर, मुद्रापट्ट, इत्यादी बनवणे किंवा नकली तयार करणे अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट नकली असल्याचे माहीत असताना तशाच उद्देशाने ते जवळ बाळगणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३४१ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही मोहोर, मुद्रापट्टी किंवा अन्य लिखित नकली असल्याचे माहीत असताना कब्जात ठेवणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कलम : ३४१ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट, किंवा अन्य लिखित नकली असल्याचे माहित असताना किंवा नकली असल्याचे विश्वास ठेवण्यास कारण असाताना, अप्रामाणिकपणे किंवा कपटपूर्वक असली म्हणून वापरणे.
शिक्षा : अशा प्रकारे शिक्षा होईल जसे त्याने मोहोर, मुद्रापट्टी किंवा अन्य लिखित नकली केले आहे.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
१) जर कोणी एखादी मोहोर, मुद्रापट्ट किंवा ठसा उमटवण्याचे अन्य साधन बनवले किंवा नकली तयार केले आणि त्यामागे, या संहितेच्या कलम ३३८ अन्वये शिक्षापात्र होऊ शकेल असे कोणतेही बनावटीकरण करण्यासाठी त्याचा वापर करावा असा त्याचा उद्देश असेल, अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन नकली असल्याचे माहीत असून, त्याने तशा उद्देशाने ते कब्जात बाळगले तर, त्याला आजन्म कारावासाची किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जर कोणी एखादी मोहोर, मुद्रापट्ट किंवा ठसा उमटवण्याचे अन्य साधन बनवले किंवा नकली तयार केले आणि या प्रकरणातील कलम ३३८ हून अन्य कोणत्याही कलमान्वये शिक्षापात्र होऊ शकेल असे कोणतेही बनावटीकरण करण्यासाठी त्याचा वापर करावा असा त्यामागे त्याचा उद्देश असेल अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट किंवा अन्य साधन नकली असल्याचे माहीत असून, त्याने तशा उद्देशाने ते कब्जात बाळगले तर, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) जो कोणी कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन नकली असल्याचे माहीत असून कब्जात बाळगील, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) जो मोहोर, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन नकली असल्याचे माहीत असून, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण आहे, असे मोहोर, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणे खरा म्हणून वापरील त्याला, जणू काही त्याने अशा मोहोर, मुद्रापट्ट किंवा अन्य साधना बाबत बनावटीकरण केलेले असावे त्याप्रमाणे तीच शिक्षा होईल.