भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३३९ :
कलम ३३७ किंवा ३३८ मध्ये वर्णन केलेला दस्तऐवज तो बनावट असल्याचे माहीत असताना, तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणे :
कलम : ३३९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखादा दस्तऐवज बनावट असल्याचे माहीत असताना, तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणे, तो दस्तऐवज भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७ मध्ये नमूदद केलेल्या वर्णनाचचा असल्यास.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध : तो दस्तऐवज भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ मध्ये नमूद केलेल्या वर्णनाचा असल्यास.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
एखादा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तो बनावट असल्याचे स्वत:ला माहीत असूनही जो कोणी, तो कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात ठेवील त्याला जर तो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख या संहितेच्या कलम ३३७ मध्ये नमूद केलेल्या वर्णनाचा दस्तऐवज असेल तर, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल; आणि जर तो दस्तऐवज कलम ३३८ मध्ये नमूद केलेल्यांपैकी एका वर्णनाचा दस्तऐवज असेल तर, त्याला आजन्म कारावासाची किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल तर इतक्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.