भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३३३ :
दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन नंतर गृह-अतिक्रमण :
कलम : ३३३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत, हमला इत्यादी करण्याची पूर्वतयारी करुन नंतर गृह-अतिक्रमण.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीवर हमला करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापतीची, हमल्याची अगर गैरनिरोधाची भीती घालण्याची पूर्वतयारी करुन नंतर जो कोणी गृह-अतिक्रमण करील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.