भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३३१ :
गृह-अतिक्रमणाबद्दल किंवा घरफोडीबद्दल (गृह-भेदन) शिक्षा :
कलम : ३३१ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : रात्रीच्या वेळी केलेले चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध : तो चारीचा अपराध असल्यास.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध : तो चारीचा अपराध असल्यास.
शिक्षा : १४ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत, हमला इत्यादी पूर्वतयारी करुन चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत इत्यादी करण्याची पूर्वतयारी करुन रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा : १४ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३१ (७)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करताना जबर दुखापत करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३३१ (८)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : रात्रीच्या वेळी घरफोडी, इत्यादी करण्यात संयुक्तपणे निबद्ध असलेल्या निरनिराळ्या व्यक्तींपैकी एकाने मृत्यू घडवून आणणे किंवा जबर दुखापत करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी (गृह-भेदन) करील त्याला दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावसाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जो कोणी सुर्यास्ता नंतर आणि सुर्योदया पूर्वी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी (गृह-भेदन) करील त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावसाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) जो कोणी कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करण्यासाठी चोरटे गृह-अतिक्रमण, किंवा घरफोडी करील त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल,
आणि जो अपराध करण्याचा त्याचा उद्देश असेल तो अपराध म्हणजे चोरी असेल, तर कारावासाची मुदत दहा वर्षेपर्यंत वाढवता येईल.
४) जो कोणी सुर्यास्ता नंतर आणि सुर्योदया पूर्वी कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करण्यासाठी चोरटे गृह-अतिक्रमण, किंवा घरफोडी करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल, आणि जो अपराध करण्याचा त्याचा उद्देश असेल तो अपराध म्हणजे चोरी असेल, तर कारावासाची मुदत चौदा वर्षेपर्यंत वाढवता येईल.
५) कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीवर हमला करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापतीची, हमल्याची किंवा गैरनिरोधाची भीती घालण्याची पूर्वतयारी करुन नंतर जो कोणी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
६) कोणत्याही व्यक्तीला सुर्यास्ता नंतर आणि सुर्योदया पूर्वी दुखापत करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीवर हमला करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापतीची, हमल्याची किंवा गैरनिरोधाची भीती घालण्याची पूर्वतयारी करुन नंतर जो कोणी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करील त्याला चौदा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
७) जो कोणी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी करताना कोणत्याही व्यक्तीला जबर दुखापत करील, अगर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा, किंवा तिला जबर दुखापत करण्याचा प्रयत्न करील त्याला आजन्म कारावासाची, किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
८) चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी सुर्यास्ता नंतर आणि सुर्योदया पूर्वी करताना अशा अपराधाबद्दल दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने इच्छापूर्वक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणला, किवा त्याला जबर दुखापत केली, अथवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर, असे चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी करण्यात संयुक्तपणे संबंधित असलेल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व ती द्रव्यदंडासही पात्र होईल.