Bns 2023 कलम ३२६ : क्षति, पूर, आग किंवा स्फोटक पदार्थ द्वारा आगळिक :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२६ :
क्षति, पूर, आग किंवा स्फोटक पदार्थ द्वारा आगळिक :
कलम : ३२६ (क) (अ) (a)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शेतकी प्रयोजने, इत्यादी करिता लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा जेणे करुन कमी होई अशा प्रकारे आगळीक करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : हानी किंवा नुकसान झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (ख) (ब) (b)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक रस्ता, पूल, नाव्य नदी किंवा नाव्य कालवा याची खराबी करुन आणि प्रवास करण्याच्या किंवा मालमत्तेची ने – आण करण्याच्या दृष्टीने तो नादुरुस्त करुन किंवा त्याची सुरक्षितता कमी करुन आगळीक करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (ग) (क) (c)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक निचरा-गटारे नुकसानकारक होईल अशा प्रकारे भरुन वाहू देऊन किंवा त्यात अडथळा निर्माण करुन आगळीक करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (घ) (ड) (d)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन ती हलवून किंवा त्याची उपयुक्तता कमी करुन, अथवा फसवा प्रकाश दाखवून आगळीक करणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (ङ) (इ) (e)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक प्राधिकरणाने लावलेले सीमाचिन्ह नष्ट करुन, हलवून इत्यादी प्रकारे आगळीक करणे.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (च) (फ) (f)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नुकसान करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ यांद्वारे आगळीक करणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३२६ (छ) (ग) (g)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घर, इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी,-
(a) क)(अ) शेतीच्या प्रयोजनासाठी अथवा माणसांना किंवा जी मालमत्ता असेल अशा जनावरांच्या खुराकासाठी किंवा त्यांना पिण्यासाठी अथवा स्वच्छतेसाठी, अथवा कोणतीही वस्तुनिर्मिती चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये ज्या कृतीमुळे घट होेते, किंवा जिच्यामुळे तशी घट होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही कृती करुन आगळीक करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(b) ख) (ब) ज्या कृतीमुळे कोणताही सार्वजनिक रस्ता, पूल नाव्य नदी अथवा नैसर्गिक किंवा कृत्रिम नाव्य नहर प्रवास करण्याच्या किंवा मालमत्तेची ने-आण करण्याच्या दृष्टीने दुस्तर होतो, किंवा त्या दृष्टीने त्याची सुरक्षितता कमी होते, किंवा जिच्यामुळे तसे होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही कृती करुन आगळीक करील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(c) ग) (क) जिच्यामुळे कोणतेही सार्वजनिक निचरा गटार त्याला क्षती किंवा नुकसान पोचेल अशा प्रकारे भरुन वाहते, किंवा त्यात अडथळा निर्माण होतो अशी, किंवा जिच्यामुळे तसे होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही कृती करुन आगळीक करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(d) घ) (ड) कोणतेही रेल्वे, विमान किंवा जहाज मार्गप्रदर्शन करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कोणत्याही संकेत किंवा सिग्नल किंवा नाविकांना मार्गदर्शक म्हणून ठेवलेली अन्य वस्तू नष्ट करुन किंवा हलवून अथवा जिच्यामुळे असे कोणतेही संकेच चिन्ह किंवा सिग्नल नाविकांना मार्गदर्शक म्हणून कमी उपयुक्त ठरते अशी कोणतीही कृती करुन आगळीक करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(e) ङ) (इ) लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये लावण्यात आलेले कोणतेही सीमाचिन्ह नष्ट करुन, किंवा हलवून, अथवा जिच्या मुळे एक सीमाचिन्ह म्हणून अशा सीमाचिन्हाची उपयुक्तता कमी होईल अशी कोणतीही कृती करुन आगळीक करील त्याला एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(f) च) (फ) आग किंवा कोणताही स्फोटक पदार्थ यांच्याद्वारे कोणत्याही मालमत्तेचे कृषि उत्पन्ना सहित नुकसान करण्याचा त्याचा उद्देश असेल, अथवा त्यायोगे तसे नुकसान होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
(g) छ) (ग) विस्तव किंवा कोणताही स्फोटक पदार्थ याच्याद्वारे आगळीक केली आणि त्यामागे, सामान्यत: उपासनास्थान म्हणून किंवा माणसांचे वसतिस्थान म्हणून किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेचे स्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत नष्ट करण्याचा त्याचा उद्देश असेल, अथवा त्यायोगे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply