Bns 2023 कलम ३२५ : जनावरास ठार मारुन किंवा विकलांग करुन आगळीक करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२५ :
जनावरास ठार मारुन किंवा विकलांग करुन आगळीक करणे:
कलम : ३२५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही जनावरास ठार मारुन त्याच्यावर विषप्रयोग करुन, त्याला विकलांग करुन किंवा निरुपयोगी करुन आगळीक करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जनावरांचा मालक
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणतेही जनावर याला ठार करुन, विकलांग करुन, किंवा निरुपयोगी करुन आगळीक करील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply