Bns 2023 कलम ३२३ : मालमत्ता अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने हलविणे, किंवा लपवून ठेवणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२३ :
मालमत्ता अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने हलविणे, किंवा लपवून ठेवणे:
कलम : ३२३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्वत:ची किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता कपटीपणाने हलविणे किंवा लपवून ठेवणे, अथवा तसे करण्यास साह्य करणे, अथवा ती व्यक्ती ज्यास हक्कदार आहे अशी कोणतीही येणे रक्कम किंवा हक्कमागणी अप्रामाणिकपणे सोडून देणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : त्यामुळे बाधित झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी अप्रमाणिकपणाने किंवा कपटीपणाने आपली किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मालमत्ता लपवून ठेवील किंवा हलवील, अथवा ती लपवण्याच्या किंवा हलवण्याच्या कामी अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने साह्य करील अथवा ज्यास आपण हक्कदार आहोत अशी कोणतीही येणे रक्कम किंवा हक्कमागणी अप्रामाणिकपणाने सोडून देईल त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply